Ad will apear here
Next
मधुमेह विरुद्ध आपण!
भारतात मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे, असे सतत ऐकायला-वाचायला मिळते; पण तरीही आपण जीवनशैलीत बदल करत नाही, हे वास्तव आहे. यावर बोट ठेवून डॉ. अश्विन सावंत यांनी ‘मधुमेह विरुद्ध आपण!’ या पुस्तकातून संपूर्ण माहिती दिली आहे. मधुमेहाचा धोका कोणाला, त्याची कारणे, लक्षणे, मधुमेह झाल्यावर शरीरात काय घडते, मधुमेहींनी काय खावे, काय टाळावे, इन्सुलिन म्हणजे काय हे त्यांनी पुस्तकातून समजावून दिले आहे. दूध व दुधाच्या पदार्थांच्या अतिसेवनाचे परिणाम, व्यापारी डावपेच, मैद्याचे अर्थकारण याचे गणित त्यांनी सोडवून दाखवले आहे. कोल्ड्रिंक्स, साखर, चहा, गोडाचा अतिरेक व त्याचे विविध वयातील परिणाम स्पष्ट करण्यात आले आहेत. प्रौढ वयातील मधुमेह, पीसीओएस म्हणजे काय, लक्षणे, कारणे, अति इन्सुलिनचे परिणाम, मेटाबोलिक सिन्ड्रोम, मधुमेहाची पूर्वरूपे, गर्भारपणातील मधुमेह, मधुमेहासाठी आवश्यक प्रयोगशालेय तपासण्या, रक्तातील साखर कधी तपासावी, ती नियंत्रणात आहे का, मधुमेही हायपो का होतात, मधुमेहजन्य दीर्घकालीन घातक विकृती, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका, मूत्रपिंडविकृती, मधुमेह आणि लैंगिक अकार्यक्षमता अशा अनेक मुद्द्यांवर या पुस्तकात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पुस्तक : मधुमेह विरुद्ध आपण!
लेखक : डॉ. अश्विन सावंत
प्रकाशन : नवता बुक वर्ल्ड
पृष्ठे : २२०
मूल्य : २०० रुपये
(‘मधुमेह विरुद्ध आपण!’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZOXCJ
Similar Posts
मधुमेह नियंत्रणासाठी बदला जीवनशैली सध्याच्या काळात मधुमेह होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, तरुण वर्गातही याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. हा जीवनशैलीचा आजार मानला जातो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ठराविक जीवनशैली राखावी लागते. जागतिक मधुमेहदिन १४ नोव्हेंबर रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने मधुमेहतज्ज्ञ डॉ. योगेश कदम यांनी लिहिलेला हा मार्गदर्शनपर लेख
मधुमेह कसा होतो? मधुमेह अर्थात डायबेटीस हे अलीकडे आबालवृद्धांच्या काळजीचे कारण झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण मधुमेह झालेले अगदी कमी वयाचे रुग्णही आता सहज आढळू लागले आहेत. डायबेटीस कसा टाळायचा, तो का होतो, तो झाला तर काय करायचे, अशा विविध गोष्टींवर डॉ. कैलास कमोद यांनी ‘गुडबाय डायबेटीस’ या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे
मधुमेह बरा होण्याची गुरुकिल्ली मधुमेह म्हटले, की साखर आणि इन्सुलिन हे शब्दच डोळ्यांसमोर येतात पण मधुमेह बरा करण्याची गुरुकिल्ल्ली या दोन गोष्टींव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आहे, असे अलीकडेच झालेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मधुमेहातून बाहेर पडण्याचा खात्रीशीर मार्ग लवकरच सापडेल, अशी आशा या अभ्यासाने निर्माण केली आहे.
‘फ्रीडम फ्रॉम डायबेटीस’ संस्थेचा दुबईत आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव दुबई : फ्रीडम फ्रॉम डायबेटीस या संस्थेने (एफएफडी) आपल्या डायबेटीस रिव्हर्सल प्रोग्रामच्या माध्यमातून हजारो व्यक्तींना आहार, व्यायाम आणि मानसिक आरोग्याचे मार्गदर्शन करून आशा, आनंद आणि चांगले आरोग्य दिले आहे. आरोग्य क्षेत्रामधील या योगदानाबद्दल संस्थेचे संस्थापक डॉ. प्रमोद त्रिपाठी यांना दुबईतील ‘आयएफएएच’ने गौरविले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language